आज राज्यभरात लाडक्या बाप्पाचे आगमन झालेलं आहे. बाप्पाच्या आगमनादरम्यान सर्वत्र आनंदमय वातावरण निर्माण झालेलं आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरी देखील विधीनुसार पुजा करून गणरायाची स्थापना करण्यात आलेली आहे.
यावर अमोल मिटकरी गणरायाच्या देखाव्या बाबत बोलत असताना म्हणाले की, थीम बघायची झाली तर गुलाबी रिक्षा योजना, वर्षाला 3 गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपुर्ण योजना, वारकरी संप्रदाय योजना, लेक लाडकी योजना अशा अनेक योजना या देखाव्यात पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांनी वेगवेगळ्या गटकांना जो न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असं अमोल मिटकरी म्हणाले.
तर पुढे ते म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपला प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे. ज्याप्रकारे बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तांनी जे बॅनर लावले त्यावर लाडकी बहिण योजना लिहलं होत आणि त्यावर दोनचं फोटो आहेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा याचा अर्थ आम्ही त्याला विरोध केला असं नाही.
ज्यावेळी माझ्या घरी बाप्पाच्या पाया पडायला माझ्या ओळखीचे लोक येतात तेव्हा त्यांना सुद्धा या सर्व योजनांबद्दल जाणीव व्हीवी म्हणून हा देखावा उभारण्यात आलेला आहे. जस मागच्या वर्षी आम्ही शिवकालिन गाव उभारलं होत तस यावर्षी हा देखावा उभारण्यात आला आहे.